महाबळेश्वर महापर्यटन उत्सवात मॉर्निंग रागाज, सायक्लथाॅन, फन रन मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग #mahableshwar mahaparytan

पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : महाराष्ट्र महापर्यटन उत्सव, महाबळेश्वर येथे
दि. 2 ते 4 मे या कालावधीमध्ये होत आहे. विल्सन पॉईंट येथे योग सत्र आणि मोर्निंग रागाज – वाद्य संगीत, फन रन आणि सायक्लथॉन यांचे आयोजन करण्यात आले. सायक्लथॉनचा शुभारंभ पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याहस्ते झेंडा दाखवून झाला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज यांची यावेळी प्रमुख उपस्थितीत होती.
डॉ. गजानन सराफ आणि सहकारी यांनी हे योगसत्र घेतले. सुविख्यात बासरीवादक अमर ओक यांनी मॉर्निंग रागाज हा वाद्य संगीताचा कार्यक्रम सादर केला. यावेळी पर्यटक स्थानिक नागरिक विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दरवर्षी महाराष्ट्राच्या महसूली विभागातील महत्वाच्या पर्यटन स्थळांचे Branding करण्यासाठी महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने महाबळेश्वर येथे “महापर्यटन उत्सव: सोहळा महाराष्ट्राचा” या तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दि. 2 ते 4 मे 2025 या दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होत आहे.
पर्यटन स्थळांची प्रसिध्दी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी यादृष्टीने महोत्सवाचे आयोजन या ठिकाणी होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या पर्यटन स्थळाचाही समावेश आहे.
या उत्सवात विविध नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्र प्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, मुलांसाठी कार्यशाळा, हेलिकॉप्टर राईड, ड्रोन शो, फूड स्टॉल, फ्ली बाजार, मंदिर तथा अन्य पर्यटन स्थळांना भेटी, फोटोग्राफी कार्यशाळा, तरंगता बाजार (फ्लोटिंग मार्केट), लेझर शो, योग सत्र आणि मोर्निंग रागाज – वाद्य संगीत, फन रन आणि सायक्लथॉन परिसंवाद- जल पर्यटनातील संधी, बायोडायनामिक फार्मिंग शाळा, महाराष्ट्राचे पर्यटन धोरण, कार्निवल परेड, हैप्पी स्ट्रीट, बोट प्रदर्शनी व कार्यशाळा, हेलिकॉप्टर राईड, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, स्वरोत्सव आशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महामंडळाचे यावेळी महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, वरीष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे, वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे
तहसीलदार तेजस्विनी पाटील यांची उपस्थिती होती.



कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘ पांचगणी न्यूज ‘ आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright :http://www.panchganinewes.com सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.